राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे पुण्यात काँग्रेसचे आंदोलन !

नॅशनल हेराल्ड आर्थिक अपव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार, तसेच भाजपविरोधात घोषणा दिल्या आणि टायर पेटवून ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.

ईडीच्या विरोधात काँग्रेसच्या मंत्र्यांसह कार्यकर्त्यांचा मोर्चा !

जनतेची कामे करायची सोडून मोर्चा काढून आरोपींना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी काय कामाचे ?

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

नागपूर येथे काँग्रेसी नेते शेख हुसैन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुत्र्याप्रमाणे मृत्यू होणार असल्याचे आक्षेपार्ह विधान !

नूपुर शर्मा यांच्या पैगंबर यांच्याविषयीच्या कथित अवमानकारक विधानावरून आकांडतांडव करणारे शेख हुसैन यांच्या विधानावर गप्प का आहेत ?

सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस हा विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न ! – संजय राऊत, खासदार

केंद्रीय पडताळणी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा छळ चालू आहे. हे देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना खड्ड्यात घालण्याचे काम करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 

राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून दोन टप्प्यांत चौकशी

‘नॅशनल हेराल्ड’ नियतकालिकातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात आली.

राज्यसभा निवडणुकीत मतदानाची अनुमती मिळण्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा ‘ईडी’कडे अर्ज !

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही वरिष्ठ नेते आर्थिक अपहाराच्या प्रकरणी सध्या आर्थर रोड येथील कारागृहात आहेत. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

केंद्र सरकार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात लवकरच अटक करणार ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. केंद्राने सर्व यंत्रणांना त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

‘ईडी’ने ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन’ या संघटनांची ३३ बँक खाती गोठवली

आता अशा संघटनांवर सरकारने त्वरित बंदी घातली पाहिजे !

‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?