राज्यसभा निवडणुकीत मतदानाची अनुमती मिळण्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा ‘ईडी’कडे अर्ज !

डावीकडून नवाब मलिक आणि अनिल देशमुख

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही वरिष्ठ नेते आर्थिक अपहाराच्या प्रकरणी सध्या आर्थर रोड येथील कारागृहात आहेत. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून या दिवशी निवडणूक होणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून ८ जून या दिवशी या अर्जांवर निर्णय देण्यात येणार आहे.