नागपूर येथे काँग्रेसी नेते शेख हुसैन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुत्र्याप्रमाणे मृत्यू होणार असल्याचे आक्षेपार्ह विधान !

भाजपकडून पोलिसांत तक्रार करून अटकेची मागणी

डावीकडून पंतप्रधान नरेद्र मोदी आणि शेख हुसैन

नागपूर – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सलग तिसर्‍या दिवशी ‘नॅशनल हेराल्ड’ या नियतकालिकाच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी देहली येथे अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात आली. या वेळी तीनही दिवस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच देशात इतरत्रही निदर्शने केली. नागपूर येथे याच वेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करतांना काँग्रेसचे नागपूर शहराचे माजी अध्यक्ष शेख हुसैन यांनी म्हटले, ‘नरेंद्र मोदी तुमची तशीच अवस्था होईल, जशी कुत्र्याची मृत्यूच्या वेळी होते. या विधानामुळे मला १०० नोटीस मिळतील; तरी मला त्याची पर्वा नाही. आम्ही लढत आलो आहोत आणि पुढेही लढत राहू !’
या प्रकरणी भाजपकडून पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. भाजपने हुसैन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अटक झाली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही दिली आहे.

संपादकीय भूमिका

नूपुर शर्मा यांच्या पैगंबर यांच्याविषयीच्या कथित अवमानकारक विधानावरून आकांडतांडव करणारे शेख हुसैन यांच्या विधानावर गप्प का आहेत ?