
पुणे – नॅशनल हेराल्ड आर्थिक अपव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. मागील २ दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. १७ जूनलाही त्यांना पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. त्यामुळे येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार, तसेच भाजपविरोधात घोषणा दिल्या आणि टायर पेटवून ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकार्यांना कह्यात घेतले आहे.
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस