बांगलादेशातील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी समन्वय समितीची स्थापना !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षितपणे आणण्यासाठी केंद्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ही समिती केंद्रीय यंत्रणांशी समन्वय ठेवणार आहे. या समितीच्या अंतर्गत एका पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देईल. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करून विद्यार्थ्यांना सुरक्षित परतीची प्रक्रिया जलदगतीने करण्याची विनंती केली आहे.