मराठवाडा विद्यापिठातील ११ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी कायमस्वरूपी बंद !

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या ५ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अल्प प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी विभाग प्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांची माहिती कळवण्याचे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश !

ही माहिती कोणत्याही प्रकारे अपूर्ण स्वरूपाची नसावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना दिल्या आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसित करणे आवश्यक ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देतांना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाची अभिनंदनीय कृती ! अशाच प्रकारचे अभ्यासक्रम देशातील अन्य विश्‍वविद्यालयांनीही चालू करणे आवश्यक. अशाने खर्‍या अर्थाने नीतीमान आणि चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होईल ! – संपादक

नागपूर आणि वर्धा येथील १० नामवंत खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मानसिक छळ !

खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन न देता त्यांचा मानसिक छळ करणे, हे महाविद्यालय प्रशासनाला लज्जास्पद आहे. या प्रकरणात जे पदाधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर शिक्षणमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

पालक-शिक्षक संघाने राष्ट्रध्वजातील ३ रंगांची मुखपट्टी (मास्क) न वापरण्याविषयी राबवली जनजागृती मोहीम !

गोवा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचा स्तुत्य उपक्रम !

वेतनापासून वंचित ठेवणार्‍या शिक्षण संस्थाचालकांविरुद्धची कारवाई योग्यच !

‘न्यायालयाच्या आदेशानंतरही एका शिक्षिकेला कर्तव्यावर रूजू करून न घेणे आणि वेतनापासून वंचित ठेवणे हे कृत्य हेतूपुरस्सर करणार्‍या शिक्षण संस्थाचालकांविरुद्ध अवमान कारवाई योग्यच आहे’, असे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नोंदवले आहे

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

८ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘केवळ ‘अर्थ’ आणि ‘काम’ इतकेच ध्येय ठेवून मनुष्याला अपयशाच्या वाटेवर नेणारे आधुनिक शिक्षण !’ यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया.

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !

वेंगुर्ले केंद्रावर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी जिल्ह्याबाहेरील मुले बसवल्याचा आरोप

वेंगुर्ले तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थी बसवण्यात आल्याचा आरोप