मंदिरे हीच ‘लक्ष्य’ !
उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील डासना क्षेत्रात असलेले देवीचे मंदिर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. देशात एखादी गोष्ट चर्चेत येणे अथवा आणली जाणे; म्हणजे त्यासंबंधी काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळे अथवा बहुतेक वेळी तो सिद्ध केल्यामुळे ! डासनादेवी मंदिराची गोष्टही काहीशी तशीच !