चोर शोधण्यास पोलिसांचे अपयश

पुणे – बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील स्वामी विवेकानंद रस्त्यावर महापालिकेने लावलेले शोभिवंत १०० एल्.ई.डी. दिवे चोरीला गेले आहेत. या प्रकरणी भाजपच्या नगरसेविका मानसी देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दिवे चोरीला गेल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०२५ या दिवशी केली होती. या चोरी प्रकरणी पोलिसांना आरोपींचा शोध लागलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पोलिसांकडे महापालिकेने अनेकदा पाठपुरावा केला. ‘आरोपी न सापडल्यामुळे अन्वेषण थांबवण्यात आले आहे. आरोपी सापडल्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले जाईल’, असे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी लेखी उत्तरामध्ये दिले आहे. (असे उत्तर देणे म्हणजे पोलिसांचा नाकर्तेपणाच म्हणावा लागेल. अशा पोलीस अधिकार्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का ? – संपादक)
चोरी १५ लाखांची, तर तक्रार अडीच लाखांची !
रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करतांना अनुमाने मूल्य हे २ लाख ५० सहस्र रुपये सांगितले. या प्रत्येक दिव्याचे मूल्य हे १५ सहस्र ७५० रुपये आहे. म्हणजे १०० दिव्यांचे मूल्य १५ लाख ७५ सहस्र रुपये होते; पण तक्रार केवळ अडीच लाखांची झाली आहे ! यामुळे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कामावर संशय निर्माण होत आहे. (असा निष्काळजीपणा करणार्या अधिकार्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन