वैदिक क्षेत्रातील सद्गुरु ब्रह्मानंद स्वामीजी यांची स्वप्नपूर्ती

पणजी – गोव्यात वैदिक शिक्षणाचा प्रसार, संवर्धन आणि वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यरत असलेल्या तपोभूमी वैदिक गुरुकुलाच्या बटूंनी गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य केले आहे. वैदिक पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वेद, संस्कृत, भारतीय संस्कार आणि शिस्त यांचे शिक्षण देत त्यांनी तरुण पिढीमध्ये भारतीय ज्ञानपरंपरेची मूल्ये रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. हे कार्य ब्रह्मीभूत राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांनी पाहिलेल्या वैदिक शिक्षणाच्या व्यापक प्रसाराच्या स्वप्नाची साकार झालेली वाटचाल मानली जात आहे. विद्यमान पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तपोभूमी आज गोव्यात वैदिक संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणार्या अग्रगण्य संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
बहुजन समाजात वैदिक ज्ञानाची क्रांती सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींनी प्रभावीपणे पुढे नेली. वैदिक ज्ञान हे समाजातील सर्व घटकांसाठी असून ते सर्वांपर्यंत पोचावे, या व्यापक दृष्टीकोनातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील अध्ययनरत बटूंनी देशातील विविध विद्यापिठे आणि शैक्षणिक संस्था यांच्या सरकार मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण होऊन पदव्या प्राप्त केल्या आहेत. यामध्ये वेदमूर्ती डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी गुजरात विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात पीएच्.डी. (विद्यावारिधि) प्राप्त केली आहे. वेदमूर्ती दत्तराज मांद्रेकर यांनी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, जयपूर येथून दर्शनशास्त्रात पदव्युत्तर पदवी (‘एम्.ए.’), वेदमूर्ती व्रजेश गुरव यांनी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, नागपूर येथून योगशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे वेदमूर्ती हर्ष, वेदमूर्ती तन्मय यांनी ऋग्वेद विभूषण आणि वेदमूर्ती बाळकृष्ण चव्हाण यांनी यजुर्वेद विभूषण ही उपाधी महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन येथून प्राप्त केली.
या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वैदिक शिक्षण, सांस्कृतिक संवर्धन आणि गोव्याच्या वैदिक वारशाच्या जतनासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल वैदिक आचार्यांचा विशेष सन्मान केला. हा सन्मान गोवा सरकारची वैदिक शिक्षण, भारतीय संस्कृती आणि राज्याचा अमूल्य वैदिक अन् सांस्कृतिक वारसा यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी कार्य करणार्या संस्था अन् व्यक्ती यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या दृढ बांधीलकीचे प्रतीक मानला जात आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन