‘हमास’ या पॅलेस्टाईनच्या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर संपूर्ण जगात २ गट पडले आहेत. एक हमासच्या बाजूचा, तर दुसरा इस्रायलच्या बाजूचा. हमासच्या बाजूने जगातील बहुतेक इस्लामी देश आहेत; कारण हमास ही एक इस्लामी संघटना आहे. इस्रायलच्या शेजारी सर्व देश हे इस्लामी देश आहेत. गेल्या ७५ वर्षांपासून इस्रायल या सर्वांशी लढा देत येथे मानाने टिकून आहे. यामुळेच अनेक इस्लामी देशांनी इस्रायलला ‘देश’ म्हणून मान्यता दिलेली नाही. इस्रायलने पॅलेस्टाईनची भूमी बळकावून तेथे स्वतःच्या देशाची निर्मिती केल्याचा आरोप पॅलेस्टाईनकडून केला जातो आणि ‘मुसलमानांवर इस्रायलने अत्याचार केले’; म्हणून इस्लामी देश इस्रायलचा विरोध करतात. भारतातही काँग्रेसचे राज्य असेपर्यंत पॅलेस्टाईनचे उघडपणे समर्थन केले जात होते. ‘पॅलेस्टाईनच्या फातीहा पक्षाचा नेता यासर अराफत याला इंदिरा गांधी, राजीव गांधी आदी काँग्रेसी पायघड्या घालत होते’, हे कुणी विसरणार नाही. यामागे भारतातील मुसलमानांचे लांगूलचालन करून त्यांची मते मिळवणे, हाच एकमेव स्वार्थ होता. आजही काँग्रेसवाल्यांची मानसिकता तीच राहिली आहे. काँग्रेसच नव्हे, तर अन्य मुसलमानप्रेमी आणि हिंदुद्वेषी राजकीय पक्ष तेच करत आहेत. ‘हमास’च्या आतंकवादी आक्रमणाचे उत्तरप्रदेशातील अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी फेरी काढून समर्थन केले. तसेच या विश्वविद्यालयाचा जिहादी मानसिकतेचा माजी विद्यार्थी शरजिल उस्मानी याने ट्वीट करून ‘मुसलमान हमासचे समर्थन करतात, तर भारतातील हिंदुत्वनिष्ठ त्याचा विरोध करतात’, असे म्हटले आहे. हे झाले मुसलमानांचे; मात्र भारतातील काही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हिंदूही हमासचे समर्थन करत आहेत. यात नेहमीच पुढे असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ट्वीट करतांना म्हटले, ‘जे हमासने केलेल्या अत्याचारांविषयी बोलत आहेत, ते पूर्वी पॅलेस्टाईनवरील अत्याचारांवर मौन बाळगून आहेत’, असे म्हणत याचे समर्थन केले आहे. यातून लक्षात येते की, जगभरातील मुसलमान हे मुसलमान म्हणून कुठेही असले, तरी एक असतात. याउलट हिंदूंचे आहे. हिंदु एकमेकांचे शेजारी असले, तरी एकमेकांना साहाय्य करत नाहीत. भारतातील धर्मांध मुसलमान आणि निधर्मीवादी कुणाच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट आहे. हमासचा विरोध करणारा एकही मुसलमान किंवा मुसलमान संघटना समोर आलेली नाही. हमासने इस्रायलवर केवळ आक्रमणच केलेले नाही, तर इस्रायलमध्ये घुसून इस्रायलच्या नागरिकांना पकडून नेले आहे. यात पुरुषांसह मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना ठार केले जात आहे. महिलांवर बलात्कार करून त्यांची नग्न धिंड काढली जात आहे. ठार झालेल्या इस्रायली नागरिकांवर लघवी केल्याचा, तर लहान मुलांना पक्षी आणि प्राणी यांच्या पिंजर्यांत ठेवल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. जितके म्हणून क्रौर्य करता येईल, तितके क्रौर्य हमासचे जिहादी आतंकवादी करत आहेत. याला युद्ध म्हणत नाहीत, तर हा ‘जिहाद’ आहे. ज्यू लोकांच्या विरोधात पॅलेस्टाईनच्या मुसलमानांनी घोषित केलेला हा जिहाद आहे. त्यामुळेच इतके अत्याचार करणार्यांचे समर्थन इराण, तुर्कीये, कतार, येमेन, पाकिस्तान आदी इस्लामी देश करत आहेत. त्यांनी एका शब्दानेही अत्याचारांचा विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
भारतातील हिंदूही असुरक्षित !
इस्रायलने प्रत्युत्तरादाखल पॅलेस्टाईनमध्ये आक्रमणे चालू केल्यावर इस्रायलमधीलच शरणार्थी मुसलमानांच्या ठिकाणी असलेल्या मशिदींच्या भोंग्यांवरून इस्रायलच्या विरोधात युद्ध करण्याची चिथावणी स्थानिक मुसलमानांना दिली जात आहे. याचा इस्रायल समाचार घेईल; मात्र ‘जिहाद करणार्यांसाठी देश महत्त्वाचा नसतो, तर धर्म महत्त्वाचा असतो’, हे येथे लक्षात घ्यायला हवे. ‘इस्लामनुसार मुसलमानांच्या व्यतिरिक्त जे धर्म आहेत आणि त्यांचे जे अनुयायी आहेत, ते सर्व काफीर आहेत अन् त्यांना ठार करणे, हे धर्मपालन आहे. त्यांची संपत्ती, महिला यांना लुटणे हे कर्तव्य आहे’, अशा प्रकारची शिकवण दिली जाते. त्यातूनच अशी मानसिकता निर्माण झाली आहे. काश्मीरमध्ये ३३ वर्षांपूर्वी हिंदूंचा याच मानसिकतेतून वंशसंहार होऊन त्यांना पलायन करावे लागले. फाळणीनंतर पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंची स्थिती हेच दाखवून देत आहे. भारतातही अनेक जिल्हे मुसलमानबहुल झाले आहेत. केरळमधील मलप्पूरम् यासाठी कुप्रसिद्ध आहे. ‘भविष्यात पाकिस्तानसमवेत युद्ध झाले, भारतात जर देशद्रोही आणि धर्मांध यांनी जिहाद पुकारला, तर त्याला सामोरे जाण्याची शक्ती आणि सिद्धता अन्य नागरिकांची आहे का ?’, ‘सुरक्षायंत्रणेची आहे का ?’, ‘शासनकर्ते तरी त्यांचे रक्षण करतील का ?’, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आजही हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकींवर मशिदींवरून आक्रमणे केली जातात. हिंदूंचा दिवसाढवळ्या शिरच्छेद केला जातो. हिंदु तरुणींना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांचे नंतर तुकडे केले जातात. हिंदुत्वनिष्ठांना वेचून ठार मारले जाते. ही स्थिती भविष्यातील स्थितीची कल्पना करून देते. नॉस्ट्रेडॅमस्च्या भविष्यानुसार ‘इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ही तिसर्या महायुद्धाची नांदी आहे’, असे म्हटले जात आहे. म्हणून हे युद्ध धर्म आणि अधर्म असेच असणार, यात शंका नाही. यात धर्म म्हणजे केवळ पंथ नाही, तर योग्य आचरण हा धर्म होय. युद्धाचा धर्म निरपराध्यांना ठार करण्याचा नाही. आज याच्या उलट हमासकडून कृत्य केले जात आहे. याच अधर्माच्या विरोधात जगभरात उठाव होऊ शकतो. हे युद्ध अत्यंत विनाशकारी असेल, यात शंका नाही. अशा विनाशाच्या काळात स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबाचे, स्वतःच्या धर्माचे आणि स्वतःच्या देशाचे रक्षण करण्याची सिद्धता प्रत्येक धर्माचरणी व्यक्तीला करावी लागणार आहे. यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.
अधर्माचरणी ‘हमास’सारख्या जिहाद्यांना नष्ट करणे, हाच आता जगाचा धर्म असेल ! |