भारतात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे. देहलीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर देशात बलात्काराच्या शिक्षेत काही पालट करून ती अधिक कठोर करण्यात आली. अल्पवयीन मुलींवरील बलात्कारांच्या घटनांतील आरोपींसाठी ‘पॉक्सो’सारखा कायदा बनवण्यात आला. तरीही बलात्काराच्या घटनांमध्ये घट होत आहे, असे दिसून आलेले नाही. सध्या बलात्कारानंतर संबंधित मुलगी, तरुणी किंवा महिला यांच्या हत्या करण्याच्या घटना अधिक घडत आहेत. ‘पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या करण्यात येते’, अशी मानसिकता आहे. यामुळे पोलिसांना आरोपींना पकडून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यास अडचणी येतात. साक्षीदार असल्यास आरोपींना शिक्षा होऊ शकते, असे दिसून येते. अशा स्थितीत बलात्काराच्या घटना अल्प होण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, हे स्पष्टच आहे. भारताच्या तुलनेत अन्य देशांत बलात्काराच्या घटना घडत नाहीत, असे नाही; मात्र तेथे न्यायप्रणाली जलद कार्य करत असल्याने अशांना शिक्षा लवकर होते. मध्य-पूर्व किंवा आखाती देशांतील म्हणजे इस्लामी देशांमध्ये शरीयत कायद्यानुसार अशा आरोपींना कठोर शिक्षा होत असल्याने बलात्काराच्या घटना क्वचित् घडत असतात, असा दावा त्या देशांकडून केला जातोे. ‘या दाव्यात तथ्य आहे का ?’, हा संशोधनाचा भाग आहे. असो. शरीयत कायद्यामध्ये बलात्कारच नव्हे, तर अनेक गुन्ह्यांमध्ये अत्यंत कठोर आणि क्रूर शिक्षा सांगितलेल्या आहेत, असे इस्लामी अभ्यासकांचे म्हणणे आहे. काही इस्लामी देशांमध्ये त्यातील काही शिक्षा लागू करण्यात आल्या आहेत. ‘या शिक्षा अमानवी आहेत’, असे सभ्य आणि सुसंस्कृत जगामध्ये म्हटले जाते. त्यामुळे ख्रिस्ती आणि बौद्ध देशांत क्रूर शिक्षा करण्यात येत नाहीत. काही देशांमध्ये फाशीच्या शिक्षा रहित करण्यात आल्या आहेत. अधिकाधिक म्हणजे आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा होते. ‘कठोर शिक्षा केल्यानेच गुन्हेगारी थांबते’, असे म्हणता येत नाही; कारण समाजावर असणारा संस्कार, गुन्हेगारांवर तातडीने होणारी कारवाई, जलद न्याययंत्रणा यांमुळेही गुन्हेगारी अल्प असते, असे दिसते. मनुष्य गुन्हे किंवा अमानवी कृत्य तेव्हा करतो, जेव्हा त्याच्यात अपेक्षा, लोभ, इर्ष्या, मत्सर आदी दुर्गुण निर्माण होऊन त्यांचा प्रभाव वाढतो. यावरच नियंत्रण आणण्यात आले, तर आपसूकच व्यक्तीकडून गुन्हे होणार नाहीत. शिस्तीचे आणि कायद्याचे पालन करण्यासाठीही समाजावर योग्य संस्कार करण्याची आवश्यकता असते. या वेळी त्यांचे उल्लंघन केल्यावर मिळणार्या दंडाच्या भयामुळेही गुन्हे रोखले जातात. पाकिस्तान हाही इस्लामी देश आहे; मात्र तेथे शरीयत कायदा लागू नसल्याने तेथे बलात्कार्यांना किंवा अन्य गुन्हे करणार्यांना हात-पाय तोडण्याची, दगड मारून ठार करण्याची, अशा शिक्षा केल्या जात नाहीत. त्यामुळे तेथेही बलात्काराच्या घटना घडत असतात; मात्र तेथे शरीयतनुसार बलात्कार्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही. इंडोनेशिया, मलेशिया या इस्लामी देशांमध्येही अशी शिक्षा दिली जात नाही.
गुन्हेगारी न्यून करण्यासाठी हे कराच !
उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशात बलात्कार रोखण्यासाठी शरीयत कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. हसन यांनी काही मासांपूर्वीही अशी मागणी केली होती. आता त्यांनी तिचा पुनरुच्चार केला आहे. तसे पाहिले तर भारतातील बहुतांश धर्मांध मुसलमानांना भारतीय न्याययंत्रणेला समांतर अशी शरीयत न्यायालये हवी आहेत. त्यामुळे हसन यांच्या मागणीमागील कुटील हेतूही लक्षात घ्यायला हवा. या देशात मुसलमान अल्पसंख्यांक असले, तरी त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेगारीत त्यांचा सहभाग अधिक असल्याचे लक्षात येते. यामागे वेगवेगळी कारणे आहेत.
शरीयत हा इस्लामी कायदा असल्याने तो इस्लामला मानणार्यांसाठी देशात लागू केल्यास अयोग्य ठरणार नाही. नाहीतरी देशात मुसलमान आणि हिंदु यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. समान नागरी कायद्याला मुसलमान विरोध करतच आहेत. हा कायदा कधी होईल, हे सांगता येत नाही; मात्र शरीयतमधील शिक्षेच्या संदर्भातील काही भाग देशातील मुसलमानांसाठी लागू करून गुन्हेगार मुसलमानांना त्या शिक्षा करण्यास चालू करावे, असे कुणालाही वाटेल. याचा सरकारने विचार करण्यास काहीच हरकत नसावी. एस्.टी. हसन यांनीही ते मान्य केले पाहिजे. भारतात हिंदु नावे धारण करून हिंदु युवतींना फसवून त्यांचे धर्मांतर करणे, त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद़्ध्वस्त करणे यांसारखे प्रकार वाढू लागले आहेत. ‘अशांना शरीयतनुसार दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा करावी’, अशी मागणी समस्त जनतेने करावी. हसन आणि त्यांची ‘री’ ओढणारे त्यांचे धर्मबांधव यांना ही मागणी मान्य असेल का ? लव्ह जिहाद्यांना अशा प्रकारे शिक्षा झाल्यास भारतातील ही समस्याच संपुष्टात येईल आणि भारतातील हिंदु तरुणी मोकळा श्वास घेऊ शकतील. यापुढे श्रद्धा वालकर यांसारख्या घटना घडणार नाहीत आणि भारतात बलात्काराचे प्रमाण आपोआप अल्प होईल. अशी मागणी कुठलाच मुसलमान करत नाही, हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
अलीकडेच एका उच्च न्यायालयाने एक निकाल देतांना स्कंद पुराणातील संदर्भ दिला. हे चांगलेच झाले. भारतात हिंदु न्यायपद्धत होती. हे न्यायदान सर्वश्रेष्ठ, गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारे आणि पीडितांना आश्वस्त करणारे होते. त्यामुळे भारतात कुणी शरीयत कायदे लागू करून भारताचे इस्लामीस्तान करण्याचा घाट घालत असतील, तर समस्त हिंदु समाजाने हिंदु न्यायपद्धत लागू करण्याची मागणी लावून धरली पाहिजे. गुन्हेगारांवर आळा घालून समाज भयमुक्त करण्यासाठी अशी मागणी करणे आवश्यक आहे.
लव्ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्यास भारतातील ही समस्याच संपुष्टात येईल !