Cannabis Addiction Malegaon : मालेगाव येथे गांजाचे व्‍यसन करणार्‍यांमध्‍ये वाढ !  

मालेगाव – येथे व्‍यसन करणार्‍या लोकांकडून (‘अल्‍प्रोझोलाम’चा) अधिक प्रमाणात वापर केला जात असे. अलीकडे व्‍यसन करणार्‍यांकडून गांजा, कोरेक्‍स (खोकल्‍याचे औषध) आदींचा वापर होतो. व्‍यसन करणार्‍यांमध्‍ये अल्‍पवयीन मुलांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना महामारीच्‍या वेळी घोषित केलेल्‍या दळणवळण बंदीच्‍या काळात अल्‍पवयीन मुले आणि तरुण यांच्‍याकडून मॅफेड्रॉनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्‍यात आला. गेल्‍या ३ तीन वर्षांत ३८ जणांवर मॅफेड्रॉनची विक्री केल्‍याच्‍या प्रकरणांत गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत. गांजा आणि कोरेक्‍स औषधाचा वापर करणार्‍यांचे प्रमाणही वाढले आहे.

कुत्तागोळीचे १० गोळ्‍यांचे पाकीट १०० रुपये, तर गांजा ४ ते ५ ग्रॅम १०० रुपये, १ ग्रॅमची एम्.डी. पावडर २ सहस्र रुपयांपर्यंत विकली जाते.

संपादकीय भूमिका

समाजाला व्‍यसनमुक्‍त करण्‍यासाठी वारंवार प्रबोधन करणे आणि साधना शिकवणे हाच मार्ग आहे !