महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार होणार !

केंद्र आणि राज्य शासनाची योजना एकत्रित केल्याने केंद्रशासनाचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिकभारही न्यून होईल.

आतंकवादी झाकीर नाईक याच्‍याकडून महसूलमंत्र्यांच्‍या संस्‍थेला कोट्यवधींचे साहाय्‍य !

राज्‍याचे महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संस्‍थेला आतंकवादी झाकीर नाईक याच्‍याकडून साडेचार ते पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्‍य्‍य मिळाले असून राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने गुन्‍हा नोंद करून अन्‍वेषण करावे. देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे माहिती नसेल, तर आम्‍ही माहिती द्यायला सिद्ध आहोत …

वारकर्‍यांसाठी महाराष्‍ट्र शासनाची विमा संरक्षण योजना !

या योजनेंतर्गत या कालावधीत एखाद्या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍यास कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्‍यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्‍व आल्‍यास १ लाख आणि अंशत: अपंगत्‍व आल्‍यास ५० सहस्र रुपये, तसेच वारीच्‍या कालावधीत आजारी पडल्‍यास औषधोपचारासाठी ३५ सहस्र रुपयांपर्यंत खर्च मिळेल

औरंगजेब आपला नेता कसा होऊ शकतो ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद (जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर) येथे औरंगजेबाच्‍या कबरीवर फुले वाहिली. त्‍यांच्‍या या कृतीने वाईट वाटले. आम्‍ही कुठल्‍याही धर्माच्‍या विरोधात नाही; पण औरंगजेब आमचा नेता आणि आमचा राजा कसा होऊ शकतो ? आमचा राजा एकच आहे, तो म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जून या दिवशी येथे आयोजित केलेल्‍या जाहीर सभेत केले.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्‍या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त !

सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या अनिल जयसिंघानी याची अनुमाने ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने पी.एम्.एल्. प्रकरणी ही कारवाई केली आहे.

तिलारी धरणाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता !

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या) कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास १७ जून या दिवशी झालेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळा’च्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महाराष्‍ट्र विदेशी गुंतवणुकीत पुन्‍हा क्रमांक एक वर ! – मुख्‍यमंत्री

पालघर येथे ‘शासन आपल्‍या दारी’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यासाठी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ भरधाव वेगाने  रसायन घेऊन जाणारा टँकर दुपारी पलटी होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी !

गृहविभागाने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी ! – राष्ट्रवादी काँग्रेसची
पोलीस आयुक्तांकडे तक्रारद्वारे मागणी

कोल्हापूर येथे जमलेल्या सहस्रो हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवल्याचे प्रकरण
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहस्रो हिंदूंची एकजूट