विशिष्ट भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमतींत घट !

केंद्रशासनाने भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमती अल्प केल्या आहेत. त्यांच्यावर लागणारा वस्तू आणि सेवा कर हा ३१.३ टक्क्यांवरून अनुक्रमे १२ आणि १८ टक्के करण्यात आला आहे.

देहलीमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर प्रशासनाकडून कारवाई

भजनपुरा येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. येथे मंदिर आणि मजार यांमुळे प्रतिदिन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे स्थानिक लोकांच्या संमतीनंतर ते हटवण्यात आले.

हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन संमत

येथे १ जुलैला रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन संमत केला.

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी पिराचा दर्गा, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे मुसलमानाकडे सापडली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद ! देहली येथील ही अल्पवयीन हिंदु मुलगी स्वत:च्या घरी कुणालाही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील ‘इंस्टाग्राम’वरील मित्र जावेद मकानदार याच्याकडे आली होती.

देहलीत धर्मांध मुसलमानाने मंदिराजवळ टाकले म्हशीचे कापलेले शीर !

देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी घटना एखाद्या चर्चबाहेर किंवा मशिदीबाहेर घडली असती, तर देहलीमध्ये एव्हाना दंगल उसळली असती ! हिंदु सहिष्णु असल्याने ते असे कृत्य करत नाहीत. तरीही हिंदूंना , , , असहिष्णु ठरवतात !

पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ !

रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून कर्जाच्या व्याजदरात एकंदर अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बँकांकडून विविध ठेवींवर आकर्षक व्याजदर दिले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

समान नागरी कायद्याला आम आदमी पक्षाचे समर्थन

आम आदमी पक्षाने समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी सांगितले की, आम्ही सैद्धांतिक मार्गाने समान नागरी कायद्याचे समर्थन करतो. घटनेतील कलम ४४ हेही या कायद्याचे समर्थन करते. देशात समान नागरी कायदा असला पाहिजे; पण हे सूत्र सर्वच धर्म आणि संप्रदाय यांतील लोकांशी जोडलेले आहे.

भारतीय ‘युनीकॉर्न’ आस्थापनांच्या संख्येत कमालीची घट !

चीनमध्ये १ सहस्त्र युनीकॉर्न आस्थापने असून एका अनुमानानुसार भारतात पुढील ५ वर्षांत २०० आस्थापने हा दर्जा प्राप्त करतील.

देहलीत दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर चोरांनी लुटले २ लाख रुपये !

राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !

देहली रेल्‍वे स्‍थानकावर खांबाद्वारे विजेचा धक्‍का लागल्‍याने महिलेचा मृत्‍यू

साक्षी आहुजा असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्‍हा नोंदवून चौकशी चालू केली आहे.