मंदिर आणि मजार (मुसलमानाचे थडगे) यांवर कारवाई !
नवी देहली – येथे प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. येथील भजनपुरा भागात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि देहली पोलीस यांच्या देखरेखीखाली हनुमान मंदिर अन् मजार हटवण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी ही कारवाई केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून कारवाईच्या वेळी संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. अतिरिक्त उपायुक्त सुबोध गोस्वामी यांनी मंदिर हटवण्यापूर्वी श्री हनुमानाची पूजा केली. भजनपुरा येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. येथे मंदिर आणि मजार यांमुळे प्रतिदिन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे स्थानिक लोकांच्या संमतीनंतर ते हटवण्यात आले.
#shorts: भजनपुरा में अवैध हनुमान मंदिर और मजार पर चला PWD का बुलडोजर।DilliTak।#bulldozer #action #bhajanpura #pwd #antiencroachment #arvindkejriwal #delhigovernment #delhipolice #delhinews #lgvskejriwal #lgvksaxena #aapvsbjp #aapdelhi pic.twitter.com/CqRpKueeka
— Dilli Tak (@DilliTak) July 2, 2023
उपायुक्त जॉय एन्. तिर्की यांनी सांगितले की, स्थानिक लोकांच्या सहकार्याने दोन्ही धार्मिक स्थळे शांततेत हटवण्यात आली. दोन्ही बांधकामे परस्पर संमतीने हटवण्यात आली. मंदिराच्या पुजार्याने स्वतः मूर्ती गाडीत ठेवल्या.
धार्मिक स्थळे पाडणे चुकीचे ! – आम आदमी पक्ष
LG साहब: मैंने कुछ दिनों पहले आपसे पत्र लिख कर अनुरोध किया था कि दिल्ली में मंदिरों एवं अन्य धार्मिक स्थलों को तोड़ने का जो आपका निर्णय, वो आप वापस ले लें। परंतु आज फिर से आपके आदेश पर भजनपुरा में एक मंदिर तोड़ दिया गया है।
मेरा आपसे पुनः निवेदन है की दिल्ली में मंदिरों एवं अन्य… https://t.co/eNmdXY5DGN
— Atishi (@AtishiAAP) July 2, 2023
देहली सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आतिशी यांनी या कारवाईला विरोध केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, उपराज्यपाल साहेब, मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला पत्र लिहून देहलीतील मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे पाडण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. तरीही आज तुमच्या आदेशावरून भजनपुरा येथील मंदिर पाडण्यात आले. माझी तुम्हाला विनंती आहे की, देहलीतील मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे पाडू नका. लोकांची श्रद्धा त्यांच्याशी जोडलेली आहे.