हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्‍थान) येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहलीतील कालकाजी, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्‍थान) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरे करण्‍यात आले.

भारताने साहाय्य केले नसते, तर आणखी एक रक्तपात झाला असता ! – महिंदा अभयवर्धने

भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले.

मणीपूर हिंसाचारावरील टिप्‍पणीवरून भारताकडून अमेरिकेच्‍या राजदूतांची कानउघाडणी !

मणीपूरमधील ख्रिस्‍ती जमातीकडून हिंसाचार केला जात असून भारतीय सुरक्षायंत्रणा त्‍यांच्‍या विरोधात कारवाई करत आहेत. त्‍यामुळे ख्रिस्‍तीधार्जिण्‍या अमेरिकेला पोटशूळ उठतो, यात काय ते आश्‍चर्य ?

(म्हणे) ‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार ! थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ?

सर्वोच्च न्यायालयाचेे विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाला निर्देश !

उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विद्यार्थ्यांना भेदभावरहित आणि मुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत ? किंवा कोणती पावले उचलण्याचा प्रस्ताव आहे ? याची माहिती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाला (‘यूजीसी’ला) दिले.

कन्हैया कुमार याची काँग्रेसच्या युवा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !

भारतविरोधी घोषणा देण्याचा आरोप असणार्‍या कन्हैया कुमार याची युवा संघटनेच्या प्रमुखपदी नेमणूक करणार्‍या काँग्रेसची राष्ट्रघातकी मानसिकता यातून दिसून येते !

कठोर अधिकार दिलेल्या ‘ईडी’वर लगाम घातला नाही, तर कुणीच सुरक्षित रहाणार नाही ! – हरीश साळवे, ज्येष्ठ अधिवक्ता

‘ईडी’, म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाला कठोर अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या अधिकारांवर लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीगत स्वातंत्र्यावर गदा येईल, असे वक्तव्य वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केले.

१५ ऑगस्टला भारताच्या प्रत्येक दूतावासाला घेरणार ! – खलिस्तानी आतंकवादी संघटनेची धमकी

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून भारताला धमकी दिली आहे.

खलिस्तान्यांना तुमच्या देशाचा वापर करू दिल्यास संबंध बिघडतील ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

डॉ. एस्. जयशंकर यांनी चेतावणी देतांना म्हटले आहे की, आम्ही कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना खलिस्तान्यांना त्यांच्या देशाचा वापर न करण्याची विनंती केली आहे. जर त्यांनी असे केले, तर . . .

गेल्या एका मासात ११ लाख ३२ सहस्र भारतियांची ट्विटर खाती बंद !

गैरवर्तनामुळे २६३ खाती, तर घृणास्पद वर्तनासाठी ८४ खाती बंद करण्यात आली आहेत. अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी ५१ खाती बंद करण्यात आली.