देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी पिराचा दर्गा, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे मुसलमानाकडे सापडली

  • पिराचा दर्गा येथील जावेद मकानदार पोलिसांच्या कह्यात

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद !

वेंगुर्ला – देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरील तिचा मित्र जावेद ताजुद्दीन मकानदार (रहाणार पिराचा दर्गा, वेंगुर्ला) याच्या घरी सापडली. या प्रकरणी पोलिसांनी मकानदार याला कह्यात घेतले आहे.

देहली येथील ही अल्पवयीन हिंदु मुलगी स्वत:च्या घरी कुणालाही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील ‘इंस्टाग्राम’वरील मित्र जावेद मकानदार याच्याकडे आली होती. या प्रकरणी जहांगीरपुरी, नॉर्थ वेस्ट देहली येथे पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. वेंगुर्ला पोलिसांना या प्रकाराविषयी माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी त्या अल्पवयीन मुलीची चौकशी केली. या मुलीची ३० जून या दिवशी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने सावंतवाडी येथील अंकुर निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. १ जुलै या दिवशी देहली येथील पोलिसांनी वेंगुर्ला येथे येऊन त्या मुलीविषयी वेंगुर्ला पोलिसांकडून माहिती घेतली. त्यानंतर संशयित मकानदार याला चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीस वेंगुर्ला पोलिसांनी देहली पोलिसांच्या कह्यात दिले. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.