खांद्यावरील रॉकेट लाँचरद्वारे डागता येणार क्षेपणास्त्रे !
नवी देहली – भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून मारा करणार्या क्षेपणास्त्र लाँचरमधून डागता येणार आहे.
India to deploy 3,000 missiles on Pak-China border
Missiles that can be fired from rocket launchers placed on the shoulder
These missiles can destroy enemy drones, fighter jets and helicopters#AirDefence #China#IndoPakBorder #IndianArmy
Image Courtesy : @thefirstindia pic.twitter.com/PpkvxsAPkA— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2024
यासाठी ६ सहस्र ८०० कोटी रुपयांची योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेला ‘व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टिम’ असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत ५०० लाँचर आणि अनुमाने ३ सहस्र क्षेपणास्त्रेे खरेदी करण्यात येणार आहेत. ती देशातच बनवली जाणार आहेत.
सौजन्य MKN NEWS
संरक्षण मंत्रालयातील अधिकार्यांनी सांगितले की, या क्षेपणास्त्रांद्वारे शत्रूचे ड्रोन, लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर नष्ट करता येतील.