यावर्षी देशात सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडणार ! – हवामान विभागाचा अंदाज

नवी देहली – यावर्षी देशात पावसाळा सामान्यपेक्षा चांगला रहाणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीपेक्षा १०४ ते ११० टक्के पाऊस चांगला मानला जातो.

१. हवामान विभागाच्या माहितीनुसार वर्ष २०२४ मध्ये १०६ टक्के म्हणजेच ८७ से.मी. पाऊस पडू शकतो. जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरी ८६.८६ सेंटीमीटर पाऊस पडणे आवश्यक असतो.

२. गेल्या मासामध्ये ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने जून ते सप्टेंबर या काळात देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला होता.