५० वर्षे जुना आसाम-मेघालय सीमावाद संपुष्टात !
आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून चालू असलेला सीमावाद अंततः संपुष्टात आला. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला.