साडेपाच कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

बागलकोटे (कर्नाटक) – साडेपाच कोटी रुपये किमतीचे एम्.डी.एम्.ए. हे अमली पदार्थ बेळ्तंगडी येथील रुग्णवाहिका चालक जलील बाबा याच्याकडून जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तो सध्या पसार आहे. अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघड झाल्यानंतर पोलिसांनी जलील याच्या विरोधात कारवाई केली. या प्रकरणात ४ जणांना आधीच अटक करण्यात आली आहे.
मंगळुरू शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सत्र न्यायालयात चालू खटल्यात जलील बाबा याला आरोपी बनवले आहे. या प्रकरणात इंदबेट्टू गावातील महंमद अल्ताफ (२८), अल्फाज आणि अन्नप्पा स्वामी उपाख्य मन्नू, तसेच उजिरे येथील महंमद मुस्तफा (२८) यांच्या विरोधात आधीच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरंभी मन्नू याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून देहलीहून बेंगळुरूला अमली पदार्थ पोचवणार्या एका मोठ्या टोळीविषयीची महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १५ जुलैला बागलकोटे जिल्ह्यातील हुनगुंद जवळच्या ‘रॉयल इन लॉज’वर धाड घालून आणखी ३ जणांना अटक केली. आरोपी देहलीहून चारचाकी वाहनाने अमली पदार्थ आणत आणि दक्षिण कन्नड, उडुपी, तसेच केरळच्या विविध भागांत पुरवठा करण्यासाठी बेंगळुरूला मुख्य केंद्र म्हणून वापरत असल्याचे समोर आले. संशय येऊ नये, यासाठी अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी जलील बाबा त्याच्या रुग्णवाहिकेचा वापर करत होता.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार