सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !

मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महानगरपालिकेला आदेश  

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा प्लास्टिक मोठ्या प्रमाणात फेकण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती जी.एस्. कुलकर्णी आणि आरती साठे यांच्या खंडपिठाने हा आदेश दिला.

‘कांजूरमार्गच्या कचराभूमीतून येणारी दुर्गंधी आणि त्यासंबंधित केल्या गेलेल्या तक्रार यांना केंद्रस्थानी ठेवून हा कठोर निर्णय घेतला आहे’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

‘मुंबई स्वच्छ ठेवणे, हे केवळ महानगरपालिकेचेच काम नाही. मुंबईतील प्रत्येक परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवणे, हे नगरसेवकांचेही दायित्व आहे. त्यानुसार कामाची विभागणी केली जावी’, असे उच्च न्यायालयाने सांगितले. नागरिकांना तक्रार प्रविष्ट करण्यासाठी साहाय्य क्रमांक दिला जाणार आहे.

संपादकीय भूमिका

न्यायालयावर असा आदेश देण्याची वेळ का येते ? पालिका प्रशासन स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाही ?