श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !

प.पू. भक्तराज महाराज

नारायणगाव (जिल्हा पुणे) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री रामचंद्र देव एवं प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळी’ यांच्या वतीने २८ आणि २९ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ जुलैला सकाळी ९ ते ११ या वेळेत प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा, दुपारी १२.३० ते २.३० वा. महाप्रसाद, संध्याकाळच्या महाप्रसादानंतर प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम होणार आहे. २९ जुलैला सकाळी ९ ते १० या वेळेत प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस अभिषेक आणि सत्यनारायण पूजा अन् भजने होणार आहेत. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होईल. कार्यक्रमाला येणार असल्याची पूर्वसूचना कांदळी आश्रमात देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.