जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ

(‘एल्जीबीटीक्यू’ समुदाय म्हणजे  समलिंगी, तसेच लिंगपरिवर्तन केलेले लोक)

बर्लिन (जर्मनी) – येथे २५ जुलैला आयोजित एल्जीबीटीक्यू समुदायाच्या सर्वांत मोठा वार्षिक कार्यक्रम ‘क्रिस्टोफर स्ट्रीट डे प्राईड’च्या वेळी रात्री आक्रमण करण्यात आले. शहराच्या मध्यभागी असलेल्या टियरगार्टन पार्जवळ इस्लामी संघटनांशी संबंधित एका व्यक्तीने एक सुसाट पांढर्‍या रंगाची व्हॅन गर्दीत घुसवली, ज्यामध्ये किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १६ इतर घायाळ झाले आहेत. घायाळांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका संशयिताची ओळख पटली असून तो आधीपासूनच बर्लिनच्या इस्लामी जाळ्याशी जोडलेला असल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत.

दोषींना कडक शिक्षा मिळेल ! – चांसलर (राष्ट्रप्रमुख) फ्रेडरिक मर्ज

या घटनेनंतर जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी सांगितले, ‘मी आणि गृहमंत्री अलेक्झांडर डोब्रिंट या आक्रमणाची संपूर्ण चौकशी करणार आहोत. या दोषींना कठोर शिक्षा मिळेल, याची आम्ही निश्चिती करू.’