
पुणे, २६ जुलै (वार्ता.) – आज प्रत्येक वस्तूच्या विक्रीसाठी ‘हलाल प्रमाणपत्रा’ची सक्ती केली जाते. सौंदर्यप्रसाधने, किराणा माल, रुग्णालय इमारत, निवासी संकुल किंवा व्यापारी संकुल बांधण्यासाठीही ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागते. हलाल प्रमाणपत्राचे दुष्परिणाम, हलाल व्यवस्था काय आहे ? त्यातील पैशांचा उपयोग कशासाठी केला जातो ? या विषयीची संपूर्ण माहिती व्हावी, या हेतूने पुणे शहरात ‘नागरिक सोशल फाऊंडेशन’ आणि ‘पुणेकर व्यापारी संघा’कडून व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘हलाल अर्थव्यवस्था’ या ग्रंथाचे लेखक श्री. रमेश शिंदे यांचे व्याख्यान आणि प्रकट मुलाखत आयोजित केली आहे.

ही मुलाखत ३१ जुलै या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. या प्रसंगी सामाजिक विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे हे उपस्थित असणार आहेत, अशी माहिती श्री. दीपक मेहेंदळे यांनी दिली आहे.
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
मिरज येथे भक्तीमय वातावरणात ‘बाळगोपाळ दिंडी सोहळा’ उत्साहात !
नागपूर येथे अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि निकाह !