सिंहगड रस्त्यावरील १ कोटी रुपयांच्या लुटीचे प्रकरण

पुणे – १ कोटी रुपयांच्या लुटी प्रकरणात नर्हे पोलिसांनी बनावट पत्रकार आशिष तिवारी याला २४ जुलैच्या मध्यरात्री अटक केली. या लूट प्रकरणात राजगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील महिला पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलीस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री या दोघांना सहआरोपी करण्यात आले आहे. सध्या २ पोलीस पसार झाले असून त्यांचा शोध चालू आहे. (चोर्या करणारे पोलीस कधी कायदा-सुव्यवस्था राखू शकतात का ? ज्या भागात चोर्या वाढतात, तेथील पोलीसच चोर्या करत नसतील कशावरून ?, अशी शंका सामान्यांना येते. – संपादक)
या २ पोलीस कर्मचार्यांसह ६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यातील विक्रम चाकणकर, अमेय कार्ले आणि गणेश कदम यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. व्यावसायिक पवार यांना खेड शिवापूर पोलीस चौकीत आणल्यानंतर पोलीस कर्मचार्यांनी बनावट पत्रकाराच्या साहाय्याने पैशांच्या पिशवीतील २० लाख रुपये काढून घेऊन ती रक्कम लपवली. हा प्रकार चुकीचा असल्याने राजगडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी ती रोकड आणि आरोपी यांना नर्हे पोलिसांच्या स्वाधीन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
पुणे येथे पूर नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त नाही !
नियमांचे उल्लंघन करून प्रकल्पांना निधी दिल्यास त्या लेखाशीर्षाचा निधी थांबवणार !
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका