विद्यार्थी आंदोलनात उमर खालिदच्या समर्थनार्थ फलक घेतल्याचे प्रकरण

पणजी, २६ जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील (‘नीट’ परीक्षेतील) प्रश्नपत्रिका फुटीच्या (पेपरफुटीच्या) प्रकरणी म्हापसा येथील लोहिया उद्यान येथे २४ जुलै या दिवशी सायंकाळी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर आझाद मैदान, पणजी येथे २५ जुलै या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या आनंदोत्सव कार्यक्रमात ‘फ्री उमर खालिद, शार्जिल इमाम, भिमा कोरेगाव १६’, असे फलक प्रसारित करण्यात आले होते. देशद्रोह्यांचे समर्थन केल्याच्या या घटनेनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. म्हापसा येथे २५ जुलैच्या रात्री म्हापसा येथील नागरिकांनी एकत्र येऊन म्हापसा पोलिसांकडे ‘फ्री उमर खालिद’ या आशयाचा फलक घेतलेल्या मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली, तर ‘अभाविप’ने या प्रकरणी २६ जुलै या दिवशी पणजी येथील आझाद मैदानात निषेध सभेचे आयोजन केले.
म्हापसा येथे २५ जुलै या दिवशी सायंकाळी उशिरा अमेय नाटेकर, सिद्धार्थ मांद्रेकर, तुषार केळकर यांच्यासह अनुमाने २०० जणांच्या युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन म्हापसा पोलीस ठाण्यात एक निवेदन दिले. याप्रसंगी ‘फ्री उमर खालिद’ हा फलक घेऊन निर्दशनात सहभागी असलेल्या मुलीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी पोलिसांनी संबंधित मुलीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावणार असल्याचे आश्वासन दिले.
पणजी येथील आझाद मैदानात २६ जुलै या दिवशी सायंकाळी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांचे नेते म्हणाले, ‘‘आम्ही विद्यार्थ्याच्या विरोधात नाही, तर विद्यार्थ्यांच्या नावाने देशाचे तुकडे करू पहाणार्यांच्या विरोधात आहोत. देहली येथून आलेले लोक गोव्यातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत आहेत. विद्यार्थी आंदोलन देशद्रोह्यांनी ‘हायजॅक’ (अपहरण) करण्याचे पाप केले आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीत सुरा खूपसण्याचा हा प्रयत्न आहे. या लोकांनी पत्रकारांना ‘गोदी मिडिया’, असे हिणवले. देशद्रोही अशासकीय संघटनांवर कारवाई करावी.’’ पणजी येथील आझाद मैदानातील ‘अभाविप’च्या आंदोलनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मुलगी कु. पार्थिवी सावंत यांनीही सहभाग घेतला होता.
अराष्ट्रीय शक्तीचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळेकर, भाजपचे नेते
गोव्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात अराष्ट्रीय शक्ती समाविष्ट झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण करावे, अशी मागणी भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळेकर यांनी पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केली.
|
म्हापसा येथे मुसलमान युवती अमरिन शेखची चौकशी आणि पणजी येथे महंमद डनीष या मुसलमानावर कारवाई म्हापसा – २४ जुलै या दिवशी सायंकाळी झालेल्या विद्यार्थी आंदोलनात ‘फ्री उमर खालिद’, हा फलक घेण्यात आला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी २६ जुलै या दिवशी आंदोलनाचे नेतृत्व करणार्या आणि ‘उजवाड’ विद्यार्थी संघटनेच्या अमरिन शेख हिचे पोलीस ठाण्यात पाचारण करून अन्वेषण केले. त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यागपत्र दिल्यानंतर पणजी येथील आझाद मैदानात आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमात ‘फ्री उमर खालिद’ फलक हाती घेतलेला महंमद डनीष याला कह्यात घेतले आहे. (यावरून मुसलमानांमध्ये लहानपणापासूनच किती देशद्रोह भरला आहे, ते दिसून येते. सूत्र ‘नीट’ पेपरफुटीचे आणि फलक देहलीत दंगल घडवणार्या उमर खालिदला मुक्त करण्याचे अन् या सर्वांना पाठिंबा काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड आदी नेत्यांचे ! देशद्रोह्यांना पाठिंबा देणार्या अशा पक्षांना गोमंतकियांनी येत्या निवडणुकीत मते मागायला आल्यावर योग्य तो धडा शिकवावा ! – संपादक) एका मुलीला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी याच आंदोलनातील प्रमुख व्यक्ती सुदीप दळवी यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी सुदीप दळवी याच्या विरोधात गुन्हाही नोंद झाला आहे. |
आंदोलनामध्ये राष्ट्रविरोधी फलक खपवून घेणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी – २५ जुलैला पणजी येथील आझाद मैदानात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यागपत्र दिल्यावरून आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमात ‘फ्री उमर खालिद, शार्जिल इमाम’, असे फलक झळकले होते. या प्रकरणी पणजी पोलिसांनी महंमद डनीष याला कह्यात घेतले आहे. पणजी पोलिसांच्या या कारवाईला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘‘शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या नावाने राष्ट्रविरोधी संदेश खपवून घेतले जाणार नाहीत. दोषीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.’’
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
संपादकीय : शिक्षणमंत्र्यांचे त्यागपत्र, पुढे काय ?