मोशी कचरा दुर्घटना प्रकरण प्रत्यक्ष जागेची पहाणी न करताच ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचर्यापासून वीज निर्मिती) प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळून ९ कर्मचार्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील अग्नीशमन अधिकार्याने जागेवर जाऊन इमारतीची पहाणी न करता ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देऊन हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवत अग्नीशमन विभागाचे केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. (प्रशासनातील अधिकार्यांच्या हलगर्जीपणाचा उत्तम नमुना ! ९ कर्मचार्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)
इमारतीच्या बांधकामासाठी वर्ष २०१९ मध्ये तात्पुरते ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आले होते. २६ जुलै २०२३ या दिवशी बांधकाम अनुमती विभागाने सुधारित नकाशा मान्य केला. या मान्यतेनुसार तळमजल्याच्या बांधकामास अनुमती होती; परंतु अग्नीशमन विभागाने ३ मजली इमारतीला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. छाननी, स्थळ पहाणी न करता अंतिम प्रमाणपत्र देण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याने आयुक्तांनी नोटीस जारी केली. सुधारित मान्य केलेला नकाशा आणि इमारतीमध्ये तफावत असतानांही ती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली नाही. सुरक्षाविषयक नियमांचे पालन न झाल्यामुळे ८ जुलै या दिवशी इमारत कोसळून दुर्घटना घडली.
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !