संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी

मशिदीत जाण्यापासून रोखल्यावरून ५ जणांवर गुन्हा नोंद

संभल (उत्तरप्रदेश) -जिल्ह्यातील एका गावातील १२० वर्षे जुन्या मशिदीत नमाजपठण करण्यावरून वाद समोर आला आहे. धुन्ना समुदायाच्या एका मुसलमान कुटुंबाने आरोप केला आहे की, तुर्की समुदायाच्या काही मुसलमानांनी त्यांना शुक्रवारचे नमाजपठण करण्यापासून रोखले. तक्रारीनंतर पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, त्यांना केवळ मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले गेले नाही, तर सामाजिक बहिष्कार, ठार मारण्याच्या धमक्या आणि गाव सोडण्यासाठी दबावही आणला जात आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंमधील जात, समुदाय यांवरून टीका करणारे मुसलमानांमधील जाती-पातींवर मौन बाळगतात !