बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

मुंबई – ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’अंतर्गत दादर रेल्वेस्थानकातून बोधगयासाठी ‘विशेष तीर्थदर्शन रेल्वे’ रवाना करण्यात आली. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ८०० पात्र लाभार्थी २० ते २६ जुलै या कालावधीत यात्रेत सहभागी झाले होते. प्रवासात भाविकांसाठी प्रवास, भोजन, निवास आणि वैद्यकीय सुविधा शासनाने विनामूल्य पुरवल्या. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, ‘‘बोधगया येथे महाराष्ट्र्रातील यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी निवासाची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० एकर जागा घेण्याची प्रक्रिया चालू आहे. ‘देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणे अन् राष्ट्रीय एकात्मता वाढवणे हा योजनेचा उद्देश असून भाविकांनी आनंदी वातावरणात यात्रा पूर्ण करावी.’’