
चिपळूण – तालुक्यातील मोरवणे या गावी हुतात्मा सुभेदार अजय ढगळे (वय ४६ वर्षे) यांच्यावर ४ एप्रिल या दिवशी शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा अजय ढवळे यांच्या पार्थिवाला त्यांची मुलगी रिया हिने मुखाग्नी दिला आहे. ढगळे यांच्या अंत्यसंस्कारसाठी मोठा जनसमुदाय जमला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्यासह माजी सैनिकांचीही उपस्थिती होती.
सुभेदार अजय ढगळे हे देशसेवेत होते. २७ मार्च या दिवशी भारत-चीन सीमेवर तवांग परिसरात रस्त्याच्या कामाच्या ‘रेकी’साठी ढगळे गेले असतांना तेथे झालेल्या भूस्खलनात ते हुतात्मा झाले. ढगळे यांचे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने रत्नागिरीत आणण्यात आले होते.
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !