गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा आणि वास्तूदोष दूर होतात ! – उत्तरप्रदेशचे मंत्री धरमपाल सिंह

धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणार्‍या प्राण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात ‘चारा बँक’ स्थापन करण्याची योजना आहे.

‘गोशाळा अर्थव्यवस्था’ यांवर नीती आयोग करत आहे विचार !

‘आम्ही केवळ गोशाळांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या शक्यता तपासून पहात आहोत. शेणाच्या जोडउत्पादनांसाठी काय करता येईल, याचा अभ्यास चालू आहे’, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी दिली.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे १०० गायींचा होरपळून मृत्यू

गाझियाबाद येथील इंदिरापूरम् भागातील झोपडपट्टीला भीषण आग लागल्यानंतर त्याचा वणवा शेजारील गोशळेत पोचल्यानंतर तेथील १०० गायींचा  होरपळून मृत्यू झाला. या दुभत्या गायी नसल्याचे श्री कृष्णा गौसेवेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे.

चमोली (उत्तराखंड) येथे गायीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धर्मांधाला अटक

अशा विकृत वासनांधांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील मंदिराच्या अध्यक्षावर कत्तलीसाठी गाय विकल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

मंदिराचे अध्यक्षच असे करत असतील, तर हिंदूंनी विश्‍वास तरी कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा होण्याची मागणी गोप्रेमी हिंदूंनी केली पाहिजे !

गायीच्या दुधामधील विशेष ‘प्रोटिन’मुळे कोरोनाचा विषाणू रोखता येतो ! – संशोधनातील निष्कर्ष

गायीच्या दुधाचे जे महत्त्व भारतातील लोकांना प्राचीन काळापासून ठाऊक आहे, ते संशोधकांना आता कुठे कळू लागले आहे !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना आणि गोहत्याबंदी कायदा असतांनाही गोहत्या होतात अन् ते रोखण्यास पोलीस अपयशी ठरतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने अशा घटनांची गंभीर नोंद घेऊन कठोर उपाययोजना केली पाहिजे !

येरवडा (पुणे) मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मिळणार पंचगव्य उत्पादने आणि गोआधारित शेतीचे धडे !

कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर प्रत्येक कैद्यास स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘नंदनवन’ हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पात आता देशी गोवंशापासून विषमुक्त सेंद्रिय शेती आणि पंचगव्य उत्पादने यांचाही समावेश !

गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

‘गोमूत्रप्राशनाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाचा उपयोग करून केलेल्या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण या लेखात दिले आहे.

जागा खाली करण्यासाठी सिडकोने पाठवलेल्या नोटिसीमुळे आसूडगाव (जिल्हा रायगड) येथील गोशाळेतील २६० गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न !

हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते.