‘श्री. नागराजू गुज्जेटी यांना त्यांचा मुलगा कु. मोक्ष गुज्जेटी याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला तेलंगाणा येथील कु. मोक्ष नागराजू गुज्जेटी (वय १० वर्षे) उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मोक्ष नागराजू गुज्जेटी हा या पिढीतील एक आहे !

कु. मोक्ष गुज्जेटी
श्री. नागराजू गुज्जेटी

१. ‘कु. मोक्ष नेहमी मोठ्यांशी आदराने बोलतो.

२. देवाची आवड

अ. मोक्ष नियमित देवपूजा करतो.

आ. ६.४.२०२२ या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. त्या वेळी मोक्ष करत असलेल्या कृती पाहून गुरुजी म्हणाले, ‘‘मोक्षवर चांगले संस्कार आहेत. त्याला देवाची आवड आहे.’’

इ. १३.८.२०२१ या दिवशी नागपंचमी होती. तेव्हा आम्ही नागाच्या संदर्भात बोलत होतो. त्या वेळी मोक्ष म्हणाला, ‘‘मी  बासरी वाजवीन. त्यामुळे नागदेवता प्रसन्न होईल आणि आपल्याला देवतेचे चैतन्य मिळेल.’’

३. धर्माभिमानी

अ. एक दिवस त्याने ‘व्हॉट्सॲप’वर ‘व्हिडिओ’मध्ये गायीविषयी अयोग्य कृत्ये केलेली पाहिली. ती पहातांना त्याला राग आला आणि तो म्हणाला, ‘‘गाय ही देवाचे रूप आहे. या लोकांना शिक्षा होईलच.’’ त्याला मार्गात गायी दिसल्या, तर तो ‘गोमातेला वंदन’, असे म्हणून हात जोडतो.

४. स्वदेशाभिमानी

तो नेहमी सांगतो, ‘‘मी कधीही विदेशात जाणार नाही. मी येथेच (भारतात) राहीन.’’

५. स्वभावदोष

आळस आणि उलट बोलणे.’

– श्री. नागराजू गुज्जेटी (मोक्षचे बाबा), करीमनगर (करीनगर), तेलंगाणा. (१०.५.२०२२)     

वर्ष २०१६ मध्ये ‘कु. मोक्ष नागराजू गुज्जेटी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५५ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.११.२०२२)