गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात हडपसर येथे तक्रार प्रविष्ट !

हडपसर (जिल्हा पुणे) – येथे गायीचे पाय बांधून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत घडली आहे. सोहेल अन्सारी याला गायीवर अनैसर्गिक अत्याचार करतांना पाहिल्यावर काही जणांनी त्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ बनवून पोलिसांना पाठवण्यात आला आहे. अमित कामठे हे त्यांच्या गायी फुरसुंगी येथील मोकळ्या जागेत गवत खाण्यासाठी बांधतात. त्यापैकी एका गायीचे पाय सलग २ दिवस बांधलेल्या अवस्थेत आढळले असता त्यांनी मित्र आणि भाऊ यांच्या साहाय्याने वरील घटना उघडकीस आणली. या प्रकरणी अमित कामठे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. यापूर्वीही देशातील काही ठिकाणी धर्मांधांकडून अशा प्रकारचे गुन्हे झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

३३ कोटी देवतांचे तत्त्व असणार्‍या गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी.