कर्जत (अहिल्‍यानगर) येथे केलेल्‍या कारवाईत ४ गोवंशियांची सुटका !

बहुतांश वेळा गोरक्षकांनाच अवैध गोवंशियांची माहिती कशी मिळते ? याचा अभ्‍यास पोलीस करतील का ?

विमाननगर (पुणे) येथे ३ गायींची कत्तलीपासून सुटका !

वाहनचालकास गायींविषयी विचारणा केली असता या गायी ‘कँप’ येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे, असे सांगितले. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

बिहारमध्ये गोतस्करांना पकडणार्‍या गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला जातो ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्‍या ठिकाणी चालू करण्यात येते.

कराड येथील गोरक्षण संस्थेवरील नगर परिषदेचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहित !

येथील भाजी-मंडईमध्ये असणार्‍या गोरक्षण केंद्राच्या भूखंडावर कराड नगर परिषदेने ‘शॉपिंग सेंटर, मार्केट आणि पार्किंग’ असे आरक्षण टाकलेले होते. सदरचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहित करण्यात आल्यामुळे …

उंब्रज (तालुका कराड) येथील गोरक्षक वैभव जाधव यांचा सत्कार !

‘गोशाला महासंघ महाराष्ट्र गोरक्षा स्थली स्मारक समिती, पुसद’ (जिल्हा यवतमाळ) यांच्या वतीने गोरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळा यांचा सत्कार करण्यात आला.

शिरूर (पुणे) येथे कत्तलीसाठी नेणार्‍या २२ वासरांची सुटका !

जर्सी गायीच्या ३ ते ४ दिवसांच्या २२ वासरांची कत्तलीसाठी मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातून वाहतूक करण्यात येत होती. विकास शेडगे या गाडीचा पाठलाग करत होते. त्यांनी याविषयी मांडवगण फराटा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत सापळा लावून गाडी पकडली आणि सर्व वासरांची सुटका केली.

गोतस्‍कराला हरियाणा उच्‍च न्‍यायालयाने जामीन नाकारल्‍याचे दुर्मिळ प्रकरण !

धर्मांध तस्‍करांना जामीन नाकारला गेल्‍याचे निकालपत्र दुर्मिळ असते. त्‍यामुळे कठोर कायदे करून धर्मांध गोतस्‍करांवर अंकुश घातला पाहिजे, तरच त्‍यांच्‍यावर थोडा तरी वचक बसेल. या सर्व गोष्‍टी हिंदु राष्‍ट्र अनिवार्य करतात.

जळगाव येथे ३३ गोवंशियांचे पाय बांधून त्यांची अवैध वाहतूक करणार्‍या तिघांना अटक !

पशूवैद्यकीय अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्‍वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

आळंदी (पुणे) येथे गोहत्‍येच्‍या निषेधार्थ ‘मूक मोर्चा’ !

आषाढी एकादशीच्‍या दिवशी खेड तालुक्‍यातील कडूसमध्‍ये काही समाजकंटकांनी गोहत्‍या केली होती. त्‍या घटनेच्‍या निषेधार्थ आळंदीमध्‍ये ग्रामस्‍थांच्‍या वतीने ८ जुलै या दिवशी ‘मूक मोर्चा’ काढण्‍यात आला. या निमित्ताने व्‍यापार्‍यांनी दुकानेही बंद ठेवली होती.

महाराष्‍ट्र गोसेवा आयोगाच्‍या प्रथम अध्‍यक्षपदी पुणे येथील शेखर मुंदडा !

महाराष्‍ट्र शासनाच्‍या महाराष्‍ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अंतर्गत आयोगाच्‍या प्रथम अध्‍यक्षपदी पुणे येथील श्री. शेखर मुंदडा यांची नियुक्‍ती झाली आहे. ते गेली अनेक वर्षे महा एन्.जी.ओ. फेडरेशनच्‍या माध्‍यमातून राज्‍यभरात गोसंवर्धनाचे काम करत आहेत.