आळंदी (जिल्हा पुणे) – आषाढी एकादशीच्या दिवशी खेड तालुक्यातील कडूसमध्ये काही समाजकंटकांनी गोहत्या केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ आळंदीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने ८ जुलै या दिवशी ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. या निमित्ताने व्यापार्यांनी दुकानेही बंद ठेवली होती. गोहत्या करणार्या आरोपींवर ‘मकोका’द्वारे कारवाई करण्याची मागणी ‘आळंदी देवस्थान’ने केली असून तसे पत्र पत्र प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांना दिले आहे.
या मूक मोर्च्याचा प्रारंभ नृसिंहस्वामी मठासमोर गायीचे पूजन करून करण्यात आला. त्यानंतर जमलेल्या आळंदीकरांनी चाकण चौक नगरप्रदक्षिणा मार्गे भैरवनाथ चौक, हजेरी मारुति मंदिर, आळंदी पोलीस ठाण्यामार्गे मोर्चा संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर महाद्वार चौक येथे आला. तेथे गोरक्षण प्रतिज्ञा व पसायदानाने मोर्चाचा समारोप करण्यात आला.