कर्जत (अहिल्‍यानगर) येथे केलेल्‍या कारवाईत ४ गोवंशियांची सुटका !

प्रतिकात्मक चित्र ( छायाचित्र सौजन्य : हिंदू जनजागृती समिती)

अहिल्‍यानगर – भिगवण येथून राशीन रस्‍त्‍याने (ता. कर्जत) गोवंशियांची अवैध वाहतूक होणार असल्‍याची माहिती गोरक्षक ऋषिकेश कामथे यांना मिळाली होती. त्‍यानुसार त्‍यांनी त्‍यांचे सहकारी गोरक्षक संतोष गुंजाळ, प्रकाश खोले, ज्ञानेश्‍वर शिंदे आदींनी पोलिसांच्‍या साहाय्‍याने गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या टेंपोवर कारवाई केली. टेंपोची पहाणी केली असता टेंपोमध्‍ये ४ गोवंश दाटीवाटीने बांधलेल्‍या अवस्‍थेत आढळून आले. या प्रकरणी ऋषिकेश कामथे यांनी दिलेल्‍या तक्रारीनुसार गणेश शिंदे आणि अमीर पठाण यांच्‍या विरोधात नगर येथील कर्जत पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

बहुतांश वेळा गोरक्षकांनाच अवैध गोवंशियांची माहिती कशी मिळते ? याचा अभ्‍यास पोलीस करतील का ?