पाकमधील ‘ओआयसी’ परिषदेत चीनचा सहभाग !

हा पाक आणि चीन यांचा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे ! आगामी काळात सरकार एकाच वेळी पाक आणि चीन यांचा सामना कसा करणार आहे ? – संपादक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (डावीकडे) चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (उजवीकडे)

इस्लामाबाद – पाकिस्तानात २२ आणि २३ मार्चला होणार्‍या ‘इस्लामी सहकार्य संघटने’च्या (ओआयसी) परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी ‘विशेष अतिथी’ म्हणून सहभागी होणार आहेत.

या परिषदेच्या २२ मार्चला होणार्‍या उद्घाटनसत्रात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मुख्य भाषण असेल. या परिषदेत ‘ओआयसी’ देशांचे वरिष्ठ अधिकारी, संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ प्रतिनिधी, ‘अरब लीग’ आणि ‘खाडी सहकार्य परिषदे’सह प्रादेशिक अन् आंतरराष्ट्रीय संघटनाही सहभागी होणार आहेत.