भारताने ‘स्वतंत्र तिबेट’ला मान्यता द्यावी ! – तिबेटचे नागरिक

तिबेटवर चीनने आक्रमण केल्यावर भारताने त्याच्या विरोधात आवाज उठवला नाही. त्यामुळे चीन उद्दाम झाला. आता तो भारतीय सीमेतही घुसखोरी करत आहे. त्यामुळे आतातरी भारताने आक्रमक भूमिका घेऊन तिबेटला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

तिबेटमध्ये नववर्षाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमांवर चीनने घातली बंदी !

चीनची दादागिरी ! चीन एकेक देश गिळंकृत करून त्याची सांस्कृतिक ओळख कशा प्रकारे पुसून टाकतो, हे यावरून दिसून येते !

चीनच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींमुळे लोकांना होत आहे रक्ताचा कर्करोग !  

चीनचे कोणतेही साहित्य हे लाभदायक ठरण्यापेक्षा त्रासदायक ठरते आणि ते हलक्या दर्जाचे असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !

भारताने कुतुब मिनारवर रशियाच्या राष्ट्रध्वजाप्रमाणे रोषणाई केल्याचा चीनच्या सरकारी वृत्तपत्राचा दावा

भारताने दावा फेटाळला !
डावपेचात हुशार असणारा चीन !

अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बाँब टाका ! – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेने त्याच्या वायूदलाच्या एफ्-२२ या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बाँब टाकावेत. यानंतर ‘चीनने हे केले’, असे सांगून आपण केवळ मागे बसून त्यांच्यातील भांडण पहात रहायचे, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

माझ्या भीतीमुळे रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकला नव्हता ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

माझ्या राजवटीतही पुतिन युक्रेनवर आक्रमण करण्याची सिद्धता करत होते; मात्र मी त्यांना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुतिन गप्प बसले, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

चीनने संरक्षण खर्चात केली ७.१ टक्के वाढ !

चीनने त्याच्या संरक्षण खर्चामध्ये ७.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. चीनने वर्ष २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद भारताच्या संरक्षण खर्चाच्या तिप्पट आहे.

देशहितासाठी भारताने प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवावी ! – भरत कार्नाड, संरक्षण आणि भूराजकीय तज्ञ

भारताने आता ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’, हे धोरण पालटले पाहिजे, तसेच देशाहितासाठी आवश्यक असल्यास प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवली पाहिजे.

युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम आणि भारताची भूमिका !

नाटो’मध्ये लढण्याची क्षमता राहिली नाही, हे रशियाला समजले आहे. दुर्दैवाने ते चीनलाही कळलेले आहे. त्यामुळे चीन रशियासारखा प्रकार तैवानमध्ये करू शकतो का ? चीन भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये असा प्रकार करू शकतो का ? आणि केला, तर काय होईल ?

युद्धाचा अपलाभ उठवत चीनकडून भारतविरोधी कुरघोडीची शक्यता !

अशा कुरापतखोर चीनला भारताने रशियाप्रमाणे आक्रमकपणे उत्तर देणे अपेक्षित आहे !