रशियाची चीनकडे साहाय्याची मागणी
वॉशिंग्टन (अमेरिका) – जर रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या संदर्भात चीनने रशियाला साहाय्य केले, तर चीनवर कठोर कारवाई करू, अशी धमकी अमेरिकेने चीनला दिली आहे. यावर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. अमेरिका आणि ‘नाटो’ देश यांनी रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाचे विदेशातील सोने आणि विदेशी चलन भंडार जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे रशियाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे रशियाने चीनकडे साहाय्य करण्याची विनंती केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी म्हटले की, चीनला आधीपासून ठाऊक होते की, रशिया युक्रेनवर आक्रमण करणार आहे. आम्ही चीनवर आधीपासूनच लक्ष ठेवून आहोत.