शासन शिवरायांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज

मुंबई – महाराष्‍ट्र शासनाच्‍या पर्यटन विभागाने गोराई येथील महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या १३६ भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. या संग्रहालयासाठी शासनाकडून ५० कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून याचे काम करण्‍यात येणार आहे. या संग्रहालयामध्‍ये  शिवरायांच्‍या गनिमी काव्‍याच्‍या युद्धनीतीसह अन्‍य लढायांची माहिती दिली जाणार आहे. महाराजांच्‍या काळातील विविध गडदुर्गांची प्रामुख्‍याने सागरी गडांची प्रतिकृती आणि अन्‍य माहितीही इथे मिळणार आहे.