अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा !

शिवरायांचा जयजयकार करतांना धर्मप्रेमी

अमरावती, ४ जून (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ जून या दिवशी अमरावती जिल्ह्यातील नवाथे प्लॉट, देऊरवाडा आणि दर्यापूर येथे ३५० वा  शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवाथे प्लॉट येथे शिवरायांच्या स्मारकाची धर्मप्रेमींनी स्वच्छता केली. मान्यवरांनी पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला आणि त्यांना अभिवादन करण्यात आले. समितीच्या अमरावती येथील स्वसंरक्षण प्रशिक्षण सेविका सौ. अर्चना मावळे यांनी सोहळा साजरा करण्याचा उद्देश आणि महत्त्व सांगितले. समितीच्या वतीने विनामूल्य घेण्यात येणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. धर्मप्रेमी सर्वश्री गोपी अहिर, मनीष देशमुख, मंगेश मदगे यांनी स्वखर्चातून उपस्थितांना पेढेवाटप केले. दर्यापूर आणि देऊरवाडा येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.