केरळममध्ये १५० हून अधिक महिलांची नग्न छायाचित्रे सिद्ध करून ती इंस्टाग्रामवर प्रसारित !

  • आरोपींकडून ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’च्या (‘एआय’च्या) तंत्रज्ञानाचा दुरुपयोग !

  • तिघा ख्रिस्ती तरुणांना अटक

  • विद्यार्थिनी आणि चर्चमध्ये येणार्‍या महिला यांचीही अशी छायाचित्रे प्रसारित !

अटक करण्यात आलेले ख्रिस्ती तरुण

कासारगोड (केरळ) – केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील एका गावात तीन ख्रिस्ती तरुणांनी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’चा दुरुपयोग करत त्यांच्या गावातील १५० हून अधिक महिलांची नग्न छायाचित्रे सिद्ध करून ती इंस्टाग्रामवर प्रसारित केली. या प्रकरणी  पोलिसांनी जस्टिन जेकब, अबिन जोसेफ आणि शिबिन लुकोस यांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यांचा हा प्रकार चालू होता.

ज्या महिलांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर उपलब्ध नव्हती, त्यांची छायाचित्रे हे तिघे त्यांच्या कॅमेर्‍याद्वारे काढत होते. या तिघांनी त्यांच्यासमवेत शिकणार्‍या किमान ४० विद्यार्थिनींच्या छायाचित्रांमध्ये पालट करून नग्न चित्रे सिद्ध केली होती. चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेसाठी जाणार्‍या महिलांनाही त्यांनी लक्ष्य केले होते. या कृत्यामुळे गावातील महिलांमध्ये घबराट पसरली आहे.

तीन आरोपींपैकी एक असलेल्या शिबिन लुकोस याच्या मित्रामुळे हा प्रकार उघडकीस आला. शिबिनच्या मित्राला सिबिनच्या भ्रमणभाषमध्ये त्याच्या एका नातेवाईकाचे अश्‍लील छायाचित्र दिसले. त्यानंतर त्याला अशी शेकडो नग्न छायाचित्रे सापडली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांनाही कह्यात घेतले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ‘आयटी’ कायद्याच्या कलम ६७ नुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !