वॉशिंग्टन – चीनने २७ जानेवारीला ‘डीपसीक’ (DeepSeek)हे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कार्यान्वित केल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात अक्षरश: उलथापालथ झाल्याचे दिसून आले. ‘एनविडिया’च्या शेअर्सनी गेल्या ४ महिन्यांतली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण नोंदवली. त्यामुळे या आस्थापनाची एकूण ६०० बिलियन डॉलर्सची हानी झाली. तसेच अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर बाजारात ३ टक्क्यांहून अधिक घसरण पहायला मिळाली.