संभाजीनगर येथे विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करणारे पथक आणि माजी आमदार यांच्यात हाणामारी

मास्कविना फिरणार्‍यांवर कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले नागरी मित्र पथक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यात १ मार्च या दिवशी वाद निर्माण होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यातील एक जण पसार झालेला आहे.

पाकडून १७ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ३ नौकाही जप्त

मासेमार्‍यांना अटक केल्यावर काही मास किंवा काही वर्षे कारागृहात रहावे लागते.

यावल येथे गोवंशियांची कातडी असलेल्या दोन ट्रकसह ४ संशयित पोलिसांच्या कह्यात !

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही गोवंशियांची सर्रास हत्या घडणे, हे सरकारला लज्जास्पद ! कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची हिंदूंची मागणी !

सोने विक्रीप्रकरणी ८ परप्रांतीय संशयित पोलिसांच्या कह्यात !

कराड तालुक्यातील पेरले गावातील सीमेत सोने तस्करी करण्यासाठी आलेल्या ४ परप्रांतीय संशयितांनी २६ फेब्रुवारी या दिवशी पाटण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यास गंभीर घायाळ केले. या घटनेची तक्रार पोलीस कर्मचारी मुकेश संभाजी मोरे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदवली.

वाई (जिल्हा सातारा) येथील पोलिसांनी दुकाने फोडणार्‍या चोरांची गावातून काढली धिंड !

गणपती आळी येथे असणारी काही दुकाने चोरांनी कटावणीच्या साहाय्याने फोडून ५२ सहस्र ३०० रुपये चोरून नेले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत दरोडेखोरांना अटक केली आणि वाई शहरातून त्यांची धिंड काढली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान सहन केला जाऊ शकत नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

हिंदूंच्या देवतांच्या अवमानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवरही आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे !

आळेफाटा (पुणे) येथे वर कोबीची पोती लावून गोमांस वाहतूक, २ टन गोमांस जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

सातारा पोलिसांची जुगाराच्या अड्ड्यावर धाड; ५० जणांना अटक

येथील शाहूपुरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून ५० जणांना अटक करण्यात आली आहे.

आनेवाडी आणि खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यावर बनावट देयके देऊन फसवणूक

कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?

केरळमध्ये चेन्नई-मंगलपूरम् एक्सप्रेसमधून १०० जिलेटीनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर जप्त

पोलिसांनी केलेल्या चौकशीत ‘विहिर खोदण्यासाठी ही स्फोटके नेत होती,’ असI रमानी नावाच्या महिलेने दावा केला आहे.