केरळमध्ये चेन्नई-मंगलपूरम् एक्सप्रेसमधून १०० जिलेटीनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर जप्त

एका महिला पोलिसांच्या कह्यात !

कोझिकोड (केरळ) – येथील रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपूरम् एक्सप्रेसमधून १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर असा स्फोटकांचा साठा सापडला आहे. रमानी नावाच्या एका महिलेकडून रेल्वे पोलिसांनी हा साठा जप्त केला असून तिला कह्यात घेण्यात आले आहे.

ही महिला मूळची तमिळनाडूची आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ‘विहिर खोदण्यासाठी ही स्फोटके नेत होती,’ असे तिने दावा केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.