
सातारा, १५ मार्च (वार्ता.) – कराड तालुक्यातील शहापूर येथील एकास अनधिकृतपणे २० टक्के व्याजदर आकारून कर्ज देणार्या खासगी सावकारास उंब्रज पोलिसांनी अटक केली आहे.
कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे येथील अनधिकृतपणे खासगी सावकारी करणारे विजय उपाख्य विराट विलास चव्हाण हे लोकांना प्रतिमास २० टक्के व्याजदराने कर्ज देत असत. तसेच कर्जाचा हप्ता चुकल्यास प्रतिदिन चक्रवाढ व्याज लागू करत असत. तसेच बळजोरीने ते लोकांकडून वसूल करत असत. चव्हाण यांच्याविरोधात शहापूर येथील प्रसाद गजानन खेडकर यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार उंब्रज पोलिसांनी चव्हाण यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने चव्हाण यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी