चीनच्या सैन्याच्या सीमाभागांतील हालचाली वाढल्या, तरी चीनला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज ! – भारतीय सैन्य

चीन सर्व सिद्धता करून भारतावर आक्रमण करायची वाट पहाण्याऐवजी भारताने स्वतः आक्रमण करून त्याला योग्य धडा शिकवला पाहिजे ! भारताने आता बचावात्मक रहाण्याची गांधीगिरी सोडली पाहिजे !

भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्‍वचषकातील सामना रहित करा !

देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार ? दुसरीकडे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही योग्य संधी आहे.

हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांची सर्वतोपरी काळजी घेण्यात अपयश येणे हे भारतीय लोकशाहीला लज्जास्पद !

पतीच्या निधनानंतर दोन मुलांचे पालन-पोषण करण्यासाठी त्यांच्या पत्नीला पुष्कळ काबाडकष्ट करावे लागले. ते कुटुंब झोपडीमध्येच रहात होते. तुटके-फुटके छत आणि बांबू-काठ्यांच्या आधारे कशीबशी त्यांची झोपडी उभी होती.

रायपूर (छत्तीसगड) रेल्वे स्थानकावरील स्फोटात सी.आर्.पी.एफ.चे ६ सैनिक घायाळ

रायपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे गाडीमध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर्.पी.एफ.चे) ६ सैनिक घायाळ झाले. या रेल्वेतून दलाच्या २११ व्या बटालियनचे सैनिक जम्मूला जात होते.

संरक्षणाच्या दृष्टीकोनातून रस्त्यांचे महत्त्व !

‘गेल्या २० वर्षांपासून भारत काश्मीर खोर्‍यामध्ये रेल्वे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु यासाठी त्याला काही वर्षे लागणार आहेत. त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे रस्ते हे सर्वांत चांगले माध्यम आहे. काश्मीरमध्ये जोझिला बोगदा बांधण्यात येत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.

पुँछमध्ये २ सैनिक हुतात्मा

भारताचे सैनिक आणखी किती दिवस असे हुतात्मा होत रहाणार आहेत ? काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कधी प्रयत्न होणार ?

पंजाब, आसाम आणि बंगाल राज्यांत सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र १५ कि.मी. वरून ५० कि.मी. पर्यंत वाढवले !

अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रपुरवठा रोखण्याचा प्रयत्न
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध

लडाखमधून सैन्य माघारी घेण्याच्या भारताच्या मागणीला चीनचा नकार !

भारताच्या भूमीत घुसखोरी करायची आणि वर भारतालाच सुनवायचे, या चिनी उद्दामपणाला भारताने जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेत चीनच्या २०० सैनिकांची घुसखोरी !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिले की, तो शेपूट घालतो, हे लक्षात घेता भारताने कायम याच भूमिकेत राहिले पाहिजे !

पंजाबच्या सीमेवरील गुरुदासपूर आणि पठाणकोट येथे पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी

भारताकडे अद्याप ड्रोनविरोधी यंत्रणा नसल्याने पाकचे फावते आहे. भारत अद्यापही संरक्षणाच्या संदर्भात मागास आहे, असे लक्षात येते !