सैन्य कारवाईमध्ये खटाव (जिल्हा सातारा) येथील सैनिक हुतात्मा !

सैनिक सूरज शेळके

सातारा, २५ जून (वार्ता.) – लडाखमधील लेह येथे खटाव तालुक्यातील सैनिक सूरज शेळके यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. यामुळे खटाव तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

३ वर्षांपूर्वी सूरज हे सैन्यात भरती झाले होते. त्यांचे पहिलेच स्थानांतर लेह-लडाख येथे झाले होते. तेथेच कर्तव्य बजावत असतांना सैन्याच्या ‘ऑपरेशन रक्षक’मध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी देशासाठी प्राणार्पण केले. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.

याच वर्षी ११ जून या दिवशी वडूज तालुक्यातील भुरकवाडीचे सुपुत्र सैनिक संग्राम फडतरे लेहमध्ये हुतात्मा झाले होते. त्यापूर्वी २७ मे या दिवशी खटाव तालुक्यातीलच विसापूर गावचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले होते.