मुसलमान तरुणांनी अग्नीवीर व्हावे ! – मुसलमान संस्थेचे आवाहन

इमामांच्या माध्यमातून आवाहन करणार !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील ‘असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स’ या संस्थेने मुसलमान तरुणांना ‘अग्नीपथ’योजनेद्वारे सैन्यात जाऊन अग्नीवीर बनवावे, असे आवाहन केले आहे.

१. या संस्थेचे संरक्षक शाहिद कामरान यांनी सांगितले की, मुसलमान तरुणांना अग्नीवीरसाठी अर्ज करून देशसेवा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी मशिदीच्या इमामांचे साहाय्य घेतले जात आहे. जर ते आवाहन करतील, तर त्याचा अधिक परिणाम होईल.

२. कानपूरचे शहर काझी सगीर आलम हबीबी यांनी म्हटले की, देशसेवा करणे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे.

३. मौलाना तौकीर रझा यांनीही ‘मुसलमान तरुणांनी अग्नीवीरसाठी अर्ज करावा. ही देशसेवेसाठी चांगली संधी आहे’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारे सैन्यात भरती झालेले भारताच्या बाजूने किती लढतील आणि शत्रू देशाच्या बाजूने किती लढतील किंवा निवृत्तीनंतर हिंसाचारात सहभागी झाले, तर त्याला कोण रोखणार ?, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींच्या मनात उपस्थित होत असेल, तर आश्‍चर्य काय ?
  • वर्ष १९४८ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केल्यावर काश्मीरचे महाराजा हरि सिंह यांच्या सैन्यातील मुसलमान सैनिक पाकला जाऊन मिळाले होते, असा इतिहास आहे !